भारतीय नौदलातून 39 वर्षाच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्ध नौका निवृत्त आय एन एस गुलदार आता सिंधुदुर्गच्या समुद्र तळाशी विसावणार आहे. रविवारी ही युद्ध नौका विजयदुर्ग बंदरातून नियुक्तीच्या दिशेने मार्गस्थ झाली असून तिथे तिला आता जलसमाधी दिली जाणार आहे.