लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. UTS ॲप 1 मार्चपासून पूर्णपणे बंद होणार असून, सर्व प्रवाशांना RailOne ॲपवर स्थलांतरित होण्याचे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे. वन नेशन, वन ॲप या संकल्पनेतून लाँच केलेले RailOne, लोकल तिकीट आणि पास बुकिंगसाठी एकमेव व्यासपीठ असेल. वैध UTS पास RailOne वर हस्तांतरित करणे आवश्यक आहे.