भंडाऱ्यातील साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्यावर चाहत्यांनी पैश्याचा वर्षाव करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हा व्हिडिओ साकोली येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त आयोजित संगीतमय कार्यक्रमादरम्यानचा आहे. त्यात आमदार नाना पटोले यांनी कलावंतांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी मंचावर जात कलावंताना दाद दिली.