भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून इतिहास रचला. नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने खेळाडूंना ५१ कोटी रुपयांचे मोठे बक्षीस जाहीर केले, जे आयसीसीच्या बक्षीस रकमेपेक्षा अधिक आहे.