मुंबईतील कोस्टल रोडला आता नवी ओळख मिळणार आहे. हा मार्ग आता देशातला सर्वांत पहिला मेलडी रोड (संगीतमय रस्ता) म्हणून ओळखला जाणार आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना, अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 'जय हो' या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जगप्रसिद्ध गाण्याची धून ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे.