इंडिगो एअर लाईन्सच्या गोंधळात मावळातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना 2 कोटींचा तर देशातील शेतकऱ्यांना दहा कोटींचा फटका बसलाय. रोज देशांतर्गत चाळीस लाख गुलाब फुलांची वाहतूक होते, त्यातील पंचवीस टक्के म्हणजे दहा लाख गुलाबांची वाहतूक ही विमानाने होते. मात्र इंडिगोच्या गोंधळानं ही फुल विविध विमानतळांवर पडून आहेत.