मालेगाव येथे झालेल्या चिमुकलीवरील अत्याचाराचे पडसाद राज्यभर उमटत असून आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले शहरात नागरिकांनी मुक मोर्चा काढत घटनेचा तीव्र निषेध केला. आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे या मागणीसाठी निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने महिला पुरूष सहभागी झाले होते. किर्तनकार इंदोरीकर महाराज देखील काही वेळासाठी आपल्या सहकाऱ्यांसह या मोर्चात सहभागी झाले होते.