लोकल ट्रेनमध्ये दिव्यांग आणि गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी एक खास डबा राखीव ठेवण्यात आलेला असतो. कल्याण ते सीएसटी कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये लोकलच्या दिव्यांग डब्यात रेल्वे स्टाफसमवेत सामान्य प्रवाशांची घुसखोरी दिसत आहे. या घुसखोरीमुळे दिव्यांग, वृद्ध व कर्करोगग्रस्त रुग्णांना दारातच उभे राहून प्रवास करावा लागत आहे.