पुण्याच्या राजगड तालुक्यातील हिरपोडी गावात मानवी वस्तीजवळ जखमी बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले. परिसरातील एका घराशेजारी रात्री बिबट्याचे दर्शन झाले. घराशेजारील झुडपात हालचाल जाणवल्याने ग्रामस्थानी टॉर्च लाऊन पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला.