जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळद परिसरात रब्बी ज्वारीवर मावा आणि चिक्का या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सतत बदलणारे हवामान, सकाळची थंडी आणि दिवसा वाढणारे तापमान यामुळे या किडींचा फैलाव वाढल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.