अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून तापमानाने पुन्हा एकदा चाळीशी पार केली आहे. काल अकोल्यातील कमाल तापमान 41 अंश सेल्सियसवर पोहोचले होते.आजही उन्हाचा कडाका कायम असल्यामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळाला.दरम्यान, हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच दुपारी घराबाहेर पडावे, तसेच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.