राज्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना दुसरीकडे भाजीपाल्याचे दर मात्र घसरले आहेत. घाऊक बाजारात अनेक भाज्यांचे दर अर्ध्यापेक्षा कमी झाले आहेत. वांगी, गवार, शेवगा, मिरची यांसारख्या भाज्यांच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. महिनाभरापूर्वी 150 रुपये किलो दराने विकली जाणारी गवार आता शेतकऱ्यांना केवळ 20 रुपये किलोने विकावी लागत आहे.