नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत असून, उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आजचे तापमान 43℃ वर पोहोचला असल्याने सकाळपासूनच कडक ऊन जाणवत असून, दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून आणि शेतकरी वर्गाला याचा अधिक फटका बसत आहे.