भंडारा जिल्ह्यातील गुंथरा येथील शेतकऱ्यांना सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक शेतकऱ्याने आपल्या शेतात काकडी, दोडके, भेंडी, कारले, टमाटे यांसारख्या विविध भाजीपाल्याची लागवड केली होती. या पिकांचा मोठा भाग निर्यातीसाठी जात असल्याने चांगला दर मिळण्याची अपेक्षा होती. मात्र सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही ठिकाणी निर्यात प्रक्रियेवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.