आयपीएलला आता गुगल जेमिनी एआयच्या रूपात नवा स्पॉन्सर मिळाला आहे. गुगलच्या या एआय प्लॅटफॉर्मने बीसीसीआयसोबत तीन वर्षांसाठी २७० कोटी रुपयांचा करार केला आहे. पारंपरिक कंपन्यांऐवजी आता एआय कंपन्या क्रिकेट स्पॉन्सरशिपमध्ये उतरत आहेत. भारतीय बाजारपेठ आणि कोट्यवधी फॅन्सपर्यंत पोहोचण्यासाठी ही एक महत्त्वाची रणनीती आहे.