भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी 2026 पासून एक मोठा दिलासा मिळणार आहे. आता तुम्ही तुमच्या कन्फर्म तिकीटाची तारीख घरबसल्या ऑनलाइन बदलू शकाल. यासाठी तुम्हाला तिकीट रद्द करण्याची किंवा कोणतेही अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान टाळता येणार आहे आणि प्रवासाची योजना करणे अधिक सोयीस्कर होणार आहे.