मालेगाव महानगरपालिकेच्या सत्तेत विराजमान झालेल्या इस्लाम पार्टीने आता शहराच्या मध्यवर्ती भागासह पूर्व आणि पश्चिम भागातही आपली उपस्थिती ठळकपणे दाखविण्यास सुरुवात केली आहे. आगामी २३ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शहराच्या विविध भागांत झळकणारे बॅनर लक्षवेधी ठरत असून, पक्षाच्या राजकीय विस्ताराच्या दृष्टीने या हालचालींकडे पाहिले जात आहे.