परभणीच्या गंगाखेड येथे निवडणूक पार पडल्यानंतर स्ट्रॉंग रूमवर राष्ट्रवादीकडून स्वतःचा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान, आठवडा उलटल्यानंतर या स्ट्रॉंग रूमवर मात्र कार्यकर्त्यांचा शुकशुकाट दिसून येते. केवळ पोलीस बंदोबस्त गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमवर पाहायला मिळाले.