आयटीआर रिफंडची वाट पाहत असलेल्या करदात्यांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. रिफंड मिळण्यास साधारणतः ४ ते ५ आठवडे लागतात, परंतु ई-पडताळणी नसणे, चुकीचे बँक तपशील यांसारख्या कारणांमुळे उशीर होऊ शकतो. आयकर पोर्टलवर लॉग इन करून तुम्ही तुमच्या रिफंडची स्थिती सहज तपासू शकता.