पुण्याच्या भोरमध्ये जय हनुमान केसरी भव्य बैलगाडा शर्यतीच आयोजन करण्यात आलं. शर्यतीत राज्यभरातून आलेल्या 350 हून अधिक बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. शर्यतींचा थरार पाहण्यासाठी बैलगाडा शौकीनांची मोठी गर्दी केली. भोरमधील भेलकेवाडीच्या जय हनुमान मंडळाकडून, महाशिवरात्री निमित्ताने बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. विजेत्या बैलगाडा मालकांना ढालीसह लाखो रुपयांची बक्षीसं देण्यात आली.