छत्तीसगडमधील माओवाद्यांची राजधानी असलेल्या कररेगुट्टा पहाडीवर पहिल्यांदाच राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. सीआरपीएफ बटालियन 196 व कोब्रा बटालियन 204 संयुक्त अभियानाने हा ध्वज आज कररेगुट्टा पहाडीच्या उंच भागावर घनघाट जंगलात फडकविण्यात आला. छत्तीसगडच्या बस्तर भागात ऑपरेशन सुरू असताना काल सायंकाळी भूसुरंग स्फोट माओवादयांनी घडवीला होता.