महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या जल यात्रेचं तुळजापुरात आयोजन करण्यात आलं. शाकंभरी नवरात्रीनिमित्त निघणारी ही जल यात्रा देवीच्या उपासनेत विशेष महत्त्वाची मानली जाते. पारंपरिक वेशभूषा, आणि ढोल-ताशांच्या गजरात ही यात्रा पापनास कुंडाकडून तुळजाभवानी मंदिराकडे मार्गस्थ झाली.