जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा कन्नड घाट सध्या पावसामुळे निसर्गसौंदर्याने बहरलेला असून पर्यटकांना खुणावत आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा ९ किमी लांबीचा हा घाट २९ वळणांचा असून त्यातील चार वळणं अतिशय धोकादायक यु आकाराची आहेत. घाटालगत असलेल्या पाटणादेवी अभयारण्यात वाघ, बिबटे यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर असल्याने साहसप्रेमींनाही हा परिसर आकर्षित करीत असतो.