जळगाव जिल्ह्यातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात महामार्गाच्या कामामुळे केळी पिकांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे केळीचे पीक खराब होत असून उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. सातत्याने नैसर्गिक संकटे झेलणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता रस्त्याच्या कामामुळे होणाऱ्या धुळीचा सामना करावा लागत आहे. यामुळे ते प्रचंड चिंतेत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत आहेत.