जळगावच्या जामनेर तालुक्यातील रोटवत गावात हनुमान जयंती निमित्त बारा गाड्यांचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. अनेक वर्षांची परंपरा असलेला बारागाड्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील तसे परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी गावातीलच लक्ष्मण भगत भिल बाराखड्या ओढतात,गाड्यावर अनेक तरुण आबालवृद्ध बसून आनंद साजरा करतात. गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील भारती पाटील तसेच बंदोबस्ताला असलेले पोलीस कर्मचारी यांनी यावेळी सहकार्य केले.