भुसावळ ते श्री क्षेत्र शेगाव पायी वारी पालखीचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत भुसावळकर मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, ठीक ठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले. भुसावळ शहरात भक्तीमय वातावरण असून 'गण गण गणात बोते' चा गजर घुमत आहे. जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिरातून या पदयात्रेचा प्रारंभ झाला, ज्यात वारकऱ्यांनी उत्साहाने भाग घेतला.