जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील गौताळा अभयारण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटणादेवी परिसरातील प्रसिद्ध केदारकुंड आणि धवलतीर्थ हे दोन्ही धबधबे प्रवाहित झाले आहेत. या धबधब्यांचे उगमस्थान असलेल्या डोंगरी नदीला पूर आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला असून, हे पाणी आता डोंगरी नदीमार्गे वलठाण धरणात दाखल होऊ लागले आहे. धबधबे परिसरातील निसर्गसौंदर्य खुलून आले असून पर्यटकांचेही लक्ष या नयनरम्य धबधब्यांकडे वेधले जात आहे.