चाळीसगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे तापमानात झालेली लक्षणीय घसरण आता कमी होताना दिसत आहे. ४२-४३ अंशांवरून ३५ अंशांपर्यंत खाली आलेला पारा पुन्हा वाढत ४० अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे कडक उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला असून उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. तापमान वाढल्यामुळे दुपारच्या वेळेत रस्तेही निर्मनुष्य झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.