जळगावच्या चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या डोंगरी तितुर नदीपात्रामध्ये जलपर्णीने अक्षरशः विळखा घातला आहे. संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने झाकले गेल्याने नदीचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात आला आहे. अडीच ते तीन फूट उंचीपर्यंत वाढलेल्या जलपर्णीमुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण निर्माण झाले असून दुर्गंधीचाही त्रास वाढू लागला आहे.