जळगावच्या चाळीसगाव शहरातून वाहणारी तितुर नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. एकेकाळी स्वच्छ पाण्यासाठी ओळखली जाणारी ही नदी आज सांडपाण्यामुळे दूषित झाली असून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, घनकचरा, झाडेझुडपी आणि जलपर्णी साचलेली दिसत आहे.