जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथे पारंपारिक ‘भोवाडे’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शेकडो वर्षांची परंपरा जपत गावातील हौशी कलावंतांनी विविध पौराणिक तसेच लोकजीवनातील पात्रांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली. पारंपारिक वेशभूषा, रंगसंगती आणि सादरीकरणातील जिवंतपणा यामुळे कार्यक्रमाला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले. ग्रामस्थांची एकजूट आणि विशेषतः युवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ही लोकपरंपरा आजही तितक्याच ताकदीने जपली जात असल्याचे पाहायला मिळाले.