जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील वावडे गावात एकाच रात्री सात ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. चोरट्यांनी रोख रक्कम, दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास केला. ही गावातली पहिलीच मोठी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बंद घरांना लक्ष्य करून चोरट्यांनी डाव साधला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथक आणि ठसे तज्ञांसह घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.