जळगाव जिल्ह्यात मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस, वादळ आणि आता तापमान वाढीमुळे भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. परिणामी अवकाळीच्या भीतीने बाजारात आवक वाढून गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर सरासरी १५ ते ४० रुपयांनी घसरले आहेत.तीव्र उन्हामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे.गृहिणींनी गल्लीत येणाऱ्या हातगाड्यांवरूनच भाजीपाला खरेदीला पसंती देत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी गवार आणि बारीक हिरवी मिरची शंभर रुपये किलोपर्यंत होती.तीव्र उन्हाळ्यामुळे भुसावळकरांच्या खरेदीच्या वेळेत बदल झाला आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बाजारात वर्दळ असते.दुपारी १२ नंतर पूर्णपणे शुकशुकाट पसरतो.उष्णतेच्या भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.सायंकाळी पुन्हा बाजार फुलतो.