धरणगाव नगर परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार व कार्यकर्ते गेल्या ९ दिवसांपासून स्ट्रॉंग रूमबाहेर थंडीत पहारा देत आहेत. ईव्हीएम सुरक्षित असल्याची खात्री होईपर्यंत जागेवरून न हटण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट संघर्ष असलेल्या या निवडणुकीत, मतमोजणी होईपर्यंत उमेदवारांनी तिथेच मुक्काम ठोकला आहे, त्यांच्या सोयीसाठी सीसीटीव्ही डिस्प्लेही बसवला आहे.