जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी चाळीसगाव येथील ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी करून सुरक्षा व व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षाचीही तपासणी करत संपूर्ण कक्षातील सोयीसुविधांची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडून निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला