जळगाव जिल्ह्यात १०९ गावांत पाणीटंचाई आहे. ३२ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. १०९ गावात ३३ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. ७७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जून महिना संपला तरी पावसाची मोठी तूट असल्याने अनेक गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे स्रोत कोरडेठाक आहेत.