जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत समाधानकारक पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील रखडलेल्या पेरणीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा मान्सूनने सुरुवातीला अनियमित हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पेरणीची कामे खोळंबली होती. मात्र, या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने कापूस, सोयाबीन, मका, बाजरी आणि इतर खरीप पिकांच्या पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.