जळगाव जिल्ह्यामध्ये दोन महिने उलटूनही पुरेसा पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली असून पिकं सुकायला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात सर्वत्र अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे मका, कापूस यासह वेगवेगळ्या पिकांची वाढ खुंटली असून पीक वाळत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांची पाने सुकायला लागलेली असून पिकांवर वेगवेगळे रोग पडत आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने अक्षरशा पीक सुकायला लागली असून पिकांची वाढ खुंटली आहे. दोन महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही, तसेच जमिनीत ओल नसल्याने पाण्याअभावी पिकांची वाढ खुटल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. आधीच पाऊस उशिरा झाल्यामुळे उशिराने पेरणी लागवड झाली त्यातही आता पावसाचा खंड पडल्यामुळे अनेक ठिकाणी बियाणं सडलं असून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवण्याची शक्यता आहे. लागवड करून दोन महिन्यात अपेक्षित वाढ न झाल्यामुळे उत्पन्नात मोठे घट होऊन नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पावसासाठी आभाळाकडे डोळे लागल्या असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.