जळगाव महापालिकेत अपक्ष उमेदवारांना वाटप केल्या जाणाऱ्या चिन्हांचे फलक प्रवेशद्वारावर लावले आहेत. आंघोळीचा साबण, मिरची, टरबूज यांसारखी गमतीशीर चिन्हे पाहायला मिळत आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लवकरच या चिन्हांचे वाटप केले जाईल. उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे चिन्ह निवडण्याची संधी असून, त्यानुसार त्यांना चिन्हांचे वाटप होईल.