जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळील लोहारखेडा-पिंप्रीभोजना येथे अंडरपासच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी महामार्ग रोखल्याने दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या एका तासापासून शेतकरी घोषणाबाजी करत असून, अंडरपासच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळे परिसरातील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.