जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेक भागांना बसला आहे. चाळीसगाव तालुक्यातील कळमडू गावासह परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे 200 ते 300 शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतजमिनीच खरडून वाहून गेल्या.