जळगाव जिल्ह्यात पावसाने अद्यापही पाठ फिरवली आहे. दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील परिस्थिती अधिकच बिकट आहे. सिंचनासाठी उपयुक्त असणारा बांधारे तलाव सध्या पूर्णपणे कोरडा पडला आहे. तलावात फक्त 10 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस न झाल्याने शेतीचे काम रखडले आहेत. तलाव कोरडे झाल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे.