जळगावच्या चाळीसगाव शहरात डिझेल टंचाईचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे.शहरातील अनेक पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा संपल्याने वाहनधारकांसह शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. खरजई रोड येथील इंडियन ऑइलच्या चरण पेट्रोल पंपावर डिझेलचे टँकर दाखल होताच काही वेळातच डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.मात्र, डिझेल संपल्याने उन्हात कित्येक तास ताठकळणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.