गॅस संपल्यामुळे गेल्या 20 ते 25 दिवसांपासून जळगाव शहरातील पाचही एलपीजी गॅस पंप बंद होते.शहरातील सर्व पाचही गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षांची चाके थांबली होती. रिक्षा चालकांच्या अडचणी वाढल्या होत्या. आता गॅस उपलब्ध झाल्यामुळे गॅस पंप पूर्व पदावर आले असून रिक्षा चालकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. गॅस पंप चालकांनी मनमानी पद्धतीने गॅसच्या दरात दुपटीने वाढ केल्याचा आरोप करीत रिक्षा चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.