जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मका पिकाची आवक काही प्रमाणात वाढली आहे. शेतकऱ्यांकडून गेल्या आठवड्याभरात मोठ्या प्रमाणावर मक्का विक्रीसाठी आणला जात होता. परंतु मक्याला पाहिजे तसा भाव मिळत नव्हता मात्र आजच्या बाजारभावात मक्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केली जात आहे. 1700 ते 1800 प्रतिक्विंटल इतका भाव मक्याला बाजार समितीमध्ये मिळत आहे. शेतकरी आता शासकीय खरेदीच्या प्रतीक्षेत आहे.