जळगावमधील महापालिकेच्या भाजपच्या महापौर दीपमाला काळे सायकलीवरून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. ७० सायकलस्वारांचा सहभाग असलेली जळगावच्या सायकलिस्ट ग्रुपची वारी सलग पाचव्या वर्षी पंढरपूरकडे रवाना झाली. या सायकल वारीत सलग दुसऱ्या वर्षी दीपमाला काळे स्वतः सायकल चालवत सहभागी झाल्या आहेत.