जळगाव महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या कार्यालयात माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील यांच्या उपस्थितीत तब्बल 108 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्ष स्वबळावर लढणार की महायुतीसोबत, यावर अद्याप निर्णय झालेला नाही, पण उमेदवारीसाठी मोठी चुरस दिसून आली.