जळगाव महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना 'थकबाकी नसल्याचा दाखला' आवश्यक आहे. हा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेत इच्छुक उमेदवारांची प्रचंड गर्दी उसळली आहे. विविध ठिकाणी प्रक्रिया राबवली जात असल्याने उमेदवारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अर्ज भरण्यासाठी कमी वेळ असल्याने एकाच ठिकाणी सोयीस्कर यंत्रणा उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.