जळगावच्या नशिराबाद येथील नगरपंचायत निवडणूकमध्ये चक्क 77 वर्षांच्या आजीबाई झाल्या विजयी. जनाबाई रंधे असे नगरसेवक पदी विजयी झालेल्या आजीचं नाव असून त्यांनी भाजप पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. नशिराबाद येथे प्रभाग क्र 7 अ मधून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या आहेत.