जिल्ह्यात यंदा कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे लागवड क्षेत्रात मोठी घट झाल्याने अपेक्षित उत्पादनात आधीच घट होण्याची शक्यता असताना, दुसरीकडे जुलै आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कापसाचे मोठे नुकसान केले आहे. या दुहेरी मारामुळे यंदा जिल्ह्यात कापसाच्या उत्पादनात ३० टक्क्यांची घट होण्याची भीती वर्तवली जात आहे.